Jio Cinema वर या चार Web Series मराठीत फुकट (Free) पाहू शकता

सध्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर बहुभाषिक वेब सिरीज बनविल्या जातात.जिओ सिनेमावर सुद्धा भरपुर बहुभाषिक चित्रपट,वेब सिरीज मराठी भाषेत उपलब्ध आहेत

Jio Cinema Free Marathi Web Series

एका काळेचे मणी Eka Kaleche Mani S1 Episode 6

ही वेब सिरीज जियो सिनेमावरील २०२३ ची त्यांची पहिलीच मराठी वेब सिरीज आहे,मराठी कुटुंबातील हलकीफुलकी विनोदी कथा यात पाहायला मिळेल,प्रशांत दामले, समीर चौघुले, हृता दुर्गुले, विशाखा सुभेदार, पोर्णिमा मनोहर, वंदना गुप्ते, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर सारखे कलाकार मंडळी यात आहेत,निर्माता महेश मांजरेकर,ज्योती देशपांडे,ऋतुराज शिंदे,ऋषी मनोहर आहेत तर दिगदर्शक अतुल केतकर आहेत.याचे लेखक ओम भुतकर, सिद्धार्थ महाशब्दे आहेत, यात एकूण सहा मालिका आहेत. 


दो गुब्बारे Do Gubbare S1 Episode 6

जियो सिनेमावरील २०२३ ची ही वेब सिरीज एक तरुण आणि म्हाताऱ्या माणसाच्या अनपेक्षित मैत्रीवर आधारित आहे.जे तुम्ही मराठी भाषेत पाहू शकता,वरूण नार्वेकर दिग्दर्शीत या मालिकेत मोहन आगाशे, सिद्धार्थ शॉ, मल्हार राठोड, मानसी पारेख आणि हेमांगी कवी. वरुण नार्वेकर आणि कल्याणी पंडित यांनी ही मालिका लिहिली आहे, ज्योती देशपांडे यांनी मालिकेची निर्मिती केली आहे आणि सौरभ भालेराव यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.यात एकुण सहा मालिका आहेत. 

(IMDb वर या मालिकेला १०/८.५ गुण दिलेले आहेत)


कालकुट Kaalkoot S1 Episode 8

ही अरुणभ कुमार लिखित आणि सुमित सक्सेना दिग्दर्शित जियो सिनेमावरील २०२३ ची गुन्हेगारी वेब सिरीज आहे.जे तुम्ही मराठी भाषेत पाहू शकता,यात विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी, सीमा बिस्वास, यशपाल शर्मा, गोपाल दत्त आणि सुझाना मुखर्जी यांच्या भूमिका आहेत. यात एकुण आठ मालिका आहेत.

 (IMDb वर या मालिकेला १०/८.४ गुण दिलेले आहेत)


रफुचक्कर Rafuchakkar S1 Episode 9

ही जियो सिनेमावरील २०२३ ची एका चोरीवर आधारीत विनोदी वेब सिरीज आहे.जे तुम्ही मराठी भाषेत पाहू शकता,ही मालिका अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांनी लिहिले आहे आणि रितम श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केले आहे, यात मनीष पॉल, प्रिया बापट, अक्षा परदासनी, सुशांत सिंग, लेखा प्रजापती आणि चाहत विग यांच्या भूमिका आहेत. यात एकुण नऊ मालिका आहेत.

(IMDb वर या मालिकेला १०/८.५ गुण दिलेले आहेत)


ज्यांना जियो सिनेमा ॲपमध्ये हे पाहायचे कसे माहित नाही त्यांच्यासाठी : आधी Movies वर क्लिक करा मग वरती भाषा Marathi निवडा खाली Must Watch Originals मध्ये मिळतील


यात इतर मराठी भाषेतील वेब सिरीज देखिल उपलब्ध आहेत जसे की Taali,Ranneeti,Khalbali Records,iIlegal, Murder in Mahim,ishq next Door,Crackdown, Inspector Avinash पण हे सगळे पाहण्यासाठी प्रत्येक महिना २९ ₹ ची Subscription घ्यावी लागते.

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा