चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहेत आणि खांडेकर आणि प्रथमेश शिवलकर यांनी एकत्र याची कथा लिहिली आहे
मित्राच्या वाढदिवशी शाळेतील लहानपणीचे सगळे मित्र ‘रियुनियन’चा बेत आखून एकत्र येण्याचे ठरवतात. आणि त्यांच्या भेटीचं ठिकाण असतं ‘काकाचा बंगला’.यानिमित्ताने सगळे या बंगल्यात येतात आणि तिथे घडलेल्या घटनेवर याची कथा आहे जी पुढे वेगवेगळे वळण घेत जाते
कलाकार :
प्रसाद खांडेकर,स्वप्निल जोशी, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे, अभिजित चव्हाण, प्रभाकर मोरे, वनिता खरात इतर कलाकार मंडळी आहेत
संगीत :
रोहन रोहन यांचा संगीत आहे,यातील मित्रा हे गाण उत्तम आहे, आणि यातील पार्श्वसंगीत देखील उत्तम आहे
निष्कर्ष :
या चित्रपटाची कथा खूप उत्तम आहे पण सगळ्या हास्यजत्रेतील अभिनेते घेतल्याने कथेला गरज असलेले गांभीर्य इथे दिसत नाही,पटकथा अजून उत्तम करता आली असती,यात अनेक ठिकाणी विनोदी संवाद आहेत पण तिथे अजिबात हसू येत नाही, उदाहरणार्थ प्राजक्ता माळीचे ते फोनवर बोलताना सतत कोणी तरी मेलेला असतो खूपच टुकार विनोद आहे,या चित्रपटातील शेवट खूप उत्तम आहे,खूप चांगली कथा सस्पेन्स असून देखील ते योग्य रीतीने वापरता आलेली नाहीये, जर या चित्रपटाचे दिग्दर्शक एखादे भयपटाचे अनुभवी दिग्दर्शक असते तर हा एक सुंदर चित्रपट म्हणून लोकांनी नक्कीच डोक्यावर घेतला असता, त्यामुळे या चित्रपटाला एकूण ५ पैकी ⭐⭐✨ गुण
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners
Comments
Post a Comment