Chaava ट्रेलर पाहून नितीश भारद्वाज यांनी सुध्दा चित्रपट करण्याची घोषणा केली
आता पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर सहा चित्रपट आणि एक मालिका प्रदर्शित झाली आहे,कोणी कोणी भूमिका साकारली जाणून घ्या.
१) "छत्रपती संभाजी" हा एन.डी सरपोतदार यानी १९२५ मध्ये दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक मूकपट आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९२५ रोजी मॅजेस्टिक सिनेमा, गिरगाव, मुंबई येथे प्रदर्शित झाला.यात पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली .
२) "छत्रपती संभाजी" हा पार्श्वनाथ आळतेकर यानी १९३४ मध्ये दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे. यात मास्टर विठ्ठल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली .
३) "स्वराज्यरक्षक संभाजी" ही मालिका
२४ सप्टेंबर २०१७ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत झी मराठीवर प्रसारित झाली होती,कार्तिक केंढे आणि विवेक देशापांडे दिग्दर्शित या ऐतिहासीक मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका डॉ अमोल कोल्हे यांनी साकारली .
४) "छत्रपती संभाजी" चित्रपटाचे मूळ शीर्षक "संभाजी १६८९" असे होते आणि त्याची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती. चित्रपट बनवण्यासाठी नऊ वर्षांचा कालावधी लागला आणि चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आव्हानांचा सामना करावा लागला. हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला.यात शशांक उदापूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली .
५) "शिवरायांचा छावा" हा दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित १६ फेब्रुवारी २०२४ चा मराठी ऐतिहासिक चित्रपट आहे. यात भूषण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.
६) "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज: भाग १" ,हा २२ नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी ऐतिहासिक चित्रपट आहे, जो तुषार शेलार दिग्दर्शित आहे ,यात ठाकूर अनूप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली .
७) "छावा" हा १४ फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या हिंदी-भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे ,जे शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर आधारीत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे .
आणि हल्लीच अभिनेता नितीश भारद्वाज यांनी सुध्दा घोषणा केली आहे की ते देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर दोन वर्षापासून अभ्यास करत आहेत, छावा चित्रपट पाहून मग ते निर्णय घेतील असे ते बोलले.
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.
Comments
Post a Comment