पण जिलबी तर गोड असते ना? Jilabi Movie Review

 १७ जानेवारी २०२५ ला जिलबी चित्रपट प्रदर्शित झाला.

Jilabi Marathi Movie Review


नितीन कांबळे दिग्दर्शित जिलबी चित्रपट एका हत्येवरून शोध त्यावरून संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या पार्श्भूमीवर याची कथा आहे,यात खटकणारी गोष्ट म्हणजे जिलबी चित्रपटाची सुरुवातच हिंदी संवादाने होते तेव्हा प्रश्न पडतो याला मराठी चित्रपट म्हणायचं का ? की मराठी/हिंदी चित्रपट म्हणायचं ? 

 

५०% हिंदी मिश्रित संवाद असलेल्या जिलबी चित्रपटाचा एकही संवाद(Dilogue) लक्षात राहत नाही, उदाहरणार्थ मुळशी पॅटर्न मधील संवाद इतके प्रसिद्ध झाले की त्यावर आजही Meme करतात लोक.नेहमी चॉकलेट बॉयची भूमिका करणाऱ्या स्वप्नील जोशी यांनी यात पहिल्यांदा एका पोलिस अधिकारीची भूमिका साकारली आहे ते तुम्हाला यात विशेष वाटेल.प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका सौरव सुभेदार हजारो कोटींचा मालक असतो पण चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही की सुभेदार कुटुंबाची हजारो कोटींची संपत्ती आणि व्यवसाय आहे.



संगीत : 

जिलबी चित्रपटात अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत(Background Music) आहे,या चित्रपटात एकही गाणं नाही आणि यातील पार्श्वसंगीत तुम्हाला जरा विचित्र वाटू शकतो. कोणत्याही चित्रपटात पार्श्वसंगीत खूप महत्त्वाचा भाग असतो पण तो जिलबीच्या पटकथेला अनुसरून वाटत नाही.



कलाकार:

अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे,पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य अशी कलाकार मंडळी जिलबीत एकत्र काम करताना पहिल्यांदाच दिसत आहेत. जिलबी चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 


निष्कर्ष :

जिलबी मराठीत गोड असेल असे वाटले होते पण गरज नसताना ५०% हिंदी संवादाने ती सप्पक झाली त्यामुळे याला ५ पैकी ⭐⭐ गुण.

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा