OTT वाल्यांनी नाकारल्याने "अमलताश" मराठी चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करावा लागला

 "अमलताश" मराठी चित्रपट ०८ मार्च २०२४ ला महाराष्ट्रसह जगभरात प्रदर्शित झाला होता,तेव्हा त्याची खूप चर्चा आणि कौतुक पण केले सर्वांनी

Amaltash Marathi Movie Review


पण नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायची वेळ आली तेव्हा नेटफ्लिक्स(Netflix),सोनी लिव्ह(Sony Liv) इतर सर्वांनी आम्हाला मराठीमध्ये इंटरेस्ट नसल्याने नको म्हणून सांगितल्याने मग शेवटी"अमलताश" चित्रपट १४ डिसेंबर २०२४ ला यूट्यूबवर प्रदर्शित करावा लागला


काल प्रसिद्ध गायक अभिनेता राहुल देशपांडे यांच्या यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट पाहिला,तुम्हाला जर शांत प्रेमळ सांगीतिक अनुभव घ्यायचा असेल तर "अमलताश" चित्रपट नक्की बघा ,खूप सुंदर कथा आणि अगदी सहज नैसर्गिक अभिनय पाहायला मिळेल. 


संगीत : 

संगीतकार भूषण मराठे यांचा सुमधुर भावनिक संगीत आणि पार्श्वसंगीत आहे ,तुम्ही जर संगीतप्रेमी असाल तर चित्रपटातील संगीतमय वातावरण तुमच्या अगदी जवळचा वाटेल.



कलाकार :

राहुल देशपांडे सोडले तर या चित्रपटातील बहुतेक कलाकार अनोळखी नवीन आहेत,पण या सर्वांचा अभिनय देखील प्रभावी आहे. सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे सहज साकारल्या आहेत. विशेषतः मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.सुहास देसले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे मुख्य भूमिकेत आहेत या दोघांच्या तुम्ही प्रेमात पडाल,बाकी प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यांच्या सुंदर भूमिका आहेत. या चित्रपटाची सुंदर पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे.



निष्कर्ष :

"अमलताश" हा एक भावनिक आणि मनोरंजक चित्रपट आहे. हा चित्रपट आपल्याला आपल्या आजूबाजूच्या सौंदर्याकडे लक्ष वेधून घेतो आणि आपल्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यास प्रोत्साहित करतो.

"अमलताश" हा एक सुंदर आणि भावनिक चित्रपट आहे जो प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. या चित्रपटाची सुंदर छायाचित्रण, संगीत आणि अभिनय यामुळे हा चित्रपट पाहणे एक सुखद अनुभव ठरेल.

या चित्रपटात एक खटकलेली गोष्ट म्हणजे पुण्याच्या कुटुंबात मराठी आई अंगाई न गाता हिंदी लोरी गाताना दाखवले आहे,आधीच हिंदीमुळे मराठी चित्रपट चालत नाही असे अनेक आरोप करताना आढळतात आणि त्यात जर मराठी चित्रपटातच हिंदी गाणी किंवा संवाद वापरत असतील तर नक्कीच ott प्लॅटफॉर्म मराठीला दूजाभाव देणार नाही तर काय करतील असा प्रश्न पडतो ? 


ही जर हिंदी लोरी यात नसती तर या चित्रपटाला नक्कीच ५ पैकी ४.५ गुण दिले असते 


या एका कारणाने या चित्रपटाला ५ पैकी 

⭐⭐⭐ गुण.

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.


Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा