संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review
"संगीत मानापमान" हा चित्रपट १९११ सालच्या मराठीतील संगीत मानापमान नाटकवर आधारित आहे.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या संगीतनाटकात बालगंधर्वांनी काम केले होते.
या अशा अजरामर संगीतनाटकावर चित्रपट करणे म्हणजेच एक खूप मोठा धाडसच आहे
जेव्हा अभिनेता सुबोध भावे संगीत मानापमान चित्रपट दिग्दर्शन करणार अशी बातमी येत होती तेव्हा सुबोध भावे यांचा संगीत नाटकावर "कट्यार काळजात घुसली" यशस्वी चित्रपट आधीच एक आहेच आणि आता अशाच संगीतनाटकावर अजून एक प्रयोग हे करू पाहत आहेत हे ऐकून जरा भीतीच वाटत होती की लोकांना परत तसाच चित्रपट आवडेल का ? पण रविवारी हा चित्रपट प्रत्यक्षात पाहिला तेव्हा लक्षात आले की "संगीत मानापमान" हा चित्रपट नाहीच... तर एक सुंदर प्रेम कथेवर आधारित सुंदर कलाकृती आहे",आणि कलाकृती हे त्यांनाच आवडते ज्यांना कलेची किंमत माहित असते
ज्या लोकांना खासकरून तरुण पिढीला हा चित्रपट नक्की कशावर आधारीत आहे हे माहीत नसेल आणि मराठीत सतत येत असलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या गर्दीत संगीत मानापमान पण एक ऐतिहासिक चित्रपट आहे असा गैरसमज अजिबात करून घेऊ नये
कारण रविवार असून देखील हा चित्रपट पहायला तेव्हढे प्रेक्षक नव्हते याची खंत वाटली, माराठीतील आता पर्यंत कधीच न पाहिलेला एक भव्य दिव्य सुंदर कलाकृती पाहण्यास ते लोक मुकले याची जास्त खंत वाटते,हा चित्रपट पाहायला जाताना हा एक संगीत नाटकावर आधारित चित्रपट आहे हे डोक्यात घेऊनच चित्रपट पाहायला जावे ही नम्र विनंती कारण युट्यूबवर या चित्रपटाला नावे ठेवत रिव्ह्यू देणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले तेव्हा वाटले होते की हा चित्रपट फसला असेल,पण आता स्वतः पाहून आल्यावर त्या लोकांची किव येते ज्यांनी या सुंदर कलाकृतीला नावे ठेवली.
"अभिनेत्री अक्षता आपटे यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हंटल्या प्रमाणे "जर तुम्हाला साऊथचा "बाहुबली" आवडला असेल, Desney चे musical Movies तुम्ही enjoy केल्या असतील तरच तुम्हाला आपल्या मराठीतील "संगीत मानापमान" चित्रपट कळेल आणि खूप आवडेल..."
कलाकार :
संगीत मानापमान मध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामी खूप गोड दिसते आणि तिचा याआधी कधीच न पाहिलेला अवतार यात पाहायला मिळाला जे चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल,सुमित राघवन यांचा उत्तम अभिनय आणि उपेंद्र लिमये यांचा अभिनय आणि भारदस्त आवाज ऐकून कान तृप्त झाले, निवेदिता अशोक सराफ,निना कुलकर्णी आणि शैलेश दातार यांचा अभिनय खूप सुंदर आहे,अर्चना निपाणकर इत्यादी अशी भली मोठी स्टारकास्ट पाहून मजा येते
संगीत :
"शंकर एहसान लॉय" यांचं संगीत म्हणजे मेजवानीच, ऋतू वसंत आज रंगला या गाण्यात शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांना पाहून अजुन भारी वाटले सुंदर चित्रीकरण आहे, सोनू निगम यांचा चंद्रिका गाणं तर नुस्ता अप्रतिम आहे,चंद्रिका गाण्याच्या आधी जे प्रश्न उत्तराचे संवाद आहेत ते तर खुप आवडला, जसराज जोशी यांनी गायलेले नीट पहा सुंदर गाणं आणि भव्य चित्रीकरण पण खुप आवडेल
निष्कर्ष :
सुंदर मधुर गाणी , सुंदर परी कथा , सुंदर पटकथा,सुंदर पार्श्वसंगीत अप्रतिम दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला
५ पैकी ⭐⭐⭐⭐ गुण
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.
Comments
Post a Comment