इलु इलु 1988 Movie Review
३१ जानेवरी २०१५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अजिंक्य फाळके आहेत आणि नितीन सुपेकर यांनी कथा लिहिली आहे
शाळेतील प्रेमकथेवर मराठीत अनेक चित्रपट याआधी खूप येऊन गेलेत तसाच हा एक शाळेतील प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहे,यात नवीन असं काही असेल तर ते नववीचा विद्यार्थी इंग्रजी शिक्षिकेच्या प्रेमात पडतो आणि तिथून या चित्रपटाची कथा गुंफत जाते
हिंदी,कन्नड,इंग्रजी,तमिळ अनेक भाषेत काम केलेल्या एली आवरामने इलू इलू 1988 मधून मराठीत पहिल्यांदाच पदार्पण करत आहे,एली आवराम स्वीडन अभिनेत्री असून देखील खूप सुंदर मराठी बोलते ते पाहून छान वाटतं,ती मुख्य भूमिकेत असून तिचा अभिनय देखील उत्तम आहे
संगीत/पार्श्व संगीत:
रोहित नागभिडे,विजय गवंडे यांनी संगीत दिला आहे, गुलाबी गुलाबी आणि हसणे तुझे या दोन गाणी सुंदर आहेत
कलाकार :
आरोह वेलणकर,एली आवराम, आनंदा कारेकर, अंकिता लांडे,निशांत भावसार, श्रीकांत यादव, विणा जामकर, वनिता खरात,विणा जगन्नाथ,इतर
निष्कर्ष :
शाळेतील गमती जमतीवर अनेक चित्रपट आहेत, तसाच हा देखिल आहे ,तुम्हाला जर शाळेतील जुनी आठवणी आवडत असतील तर हा चित्रपट आवडेल,बाकी यात शाळेतील विनोदी प्रसंग उत्तम आहेत, एकुण या चित्रपटाला ५ पैकी ⭐⭐✨ गुण
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners
Comments
Post a Comment