"बाई पण भारी देवा" पुन्हा प्रदर्शित होणार,मराठीत असे पहिल्यांदा घडत आहे
मराठीच्या इतिहासात पुन्हा प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे
![]() |
film poster © Jio Studio |
केदार शिंदे दिग्दर्शित "बाई पण भारी देवा" चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ७ मार्च २०२५ "आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित" चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे आणि Re- Release होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असेल.जियो स्टुडीओ महिलांसाठी एक विशेष भेट म्हणून पुन्हा प्रदर्शित करत आहेत
३० जून २०२३ रोजी रिलीज झालेला बाई पण भारी देवा चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले . या चित्रपटाला महिलांनी तेव्हा खूप मोठा प्रतिसाद दिला होता,एका दिवसात ₹६.१० कोटी कमावणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.केवळ ५ कोटी बजेटचा ५० दिवसात याचे एकूण कलेक्शन ₹९२ कोटींवर पोहोचले,ज्यामुळे हा सैराट नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
बाई पण भारी देवा चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे आणि प्रेक्षकांची प्रचंड मागणी आणि लोकप्रियता यामुळे हा ऐतिहासिक पाऊल उचलत आहेत.
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners
Comments
Post a Comment