सिद्धार्थ जाधव भरत जाधव यांची धमाल जोडी पुन्हा पहायला मिळणार २०२५

"आता थांबायचं नाय" या चित्रपटाचा टीझर युट्यूबवर हल्लीच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांची पहिली झलक दिसत आहे.टीझर मध्ये अजय गोगावले यांचं सुंदर शीर्षक गीत आहे,हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवराज वायचाळ आहेत आणि उमेश कुमार बन्सल,बवेश जानवलेकर, निधी परमार हिरानंदानी आणि धरम वालिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे 

Siddharth jadhav bharat jadhav both will be seen again in ata thambaych naay movie 2025
"आता थांबायचं नाय"(Ata Thambaycha Naay) या चित्रपटातून प्रेक्षकांचे लाडके कलाकार सिद्धार्थ जाधव भरत जाधव यांची धमाल जोडी पुन्हा भेटीला येणार आहेत. आणि ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत सोबत प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर इतर कलाकार मंडळी आहेत.

सिद्धार्थ जाधव व भरत जाधव यांनी याआधी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या दोघांच्या विनोदी जोडीने प्रेक्षकांना नेहमीच भरभरून हसवले आहे. ‘दे धक्का’ हा त्यांच्या गाजलेल्या चित्रपटापैकी आहे.आता पुन्हा एकदा ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार. पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांची जोडी प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत का हे पहावे लागणार.

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा