येत्या शुक्रवारी या तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत,हे तरी मराठी प्रेक्षक पाहतील का ?

आतापर्यंत २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही मराठी चित्रपटाने चांगली अपेक्षित कमाई केलेली नाहीये,येत्या शुक्रवारी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.



"चिकीचिकी बूबूमबूम" हा २८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणारा विनोदी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शक, सह-लेखक आणि सह-निर्मित प्रसाद खांडेकर यांनी नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट आणि स्वर्णपट कथा यांच्या बॅनरखाली प्राजाकर प्रोडक्शनच्या बॅनरखाली केले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव आणि वनिता खरात मुख्य भूमिकेत आहेत,याची कथा कॉलेज बॅकबेंचर्स बद्दल आहे.

"गौरीशंकर" हरेकृष्ण गौडा दिग्दर्शित आणि मूव्हीरूट प्रॉडक्शन आणि ऑरेंज प्रॉडक्शन निर्मित २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे.यात हरेकृष्ण गौडा, दक्षिणा राठोड, आणि राहुल जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत, गौरी आणि शंकर यांच्यातील प्रेम आणि त्यांच्या नात्यात येणाऱ्या आव्हानांभोवती याची कथा आहे.


"भेरा" चित्रपट संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झाला आहे, यात स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असून, अस्सल मालवणी भाषेतील ह्या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेले आहेत

येत्या २८ फेब्रुवारी २०२५ रोजी "भेरा" फक्त सिंधुदुर्गात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून संपूर्ण महाराष्टात २१ मार्च २०२५ पासून हा चित्रपट पाहता येणार, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी दिली आहे,कोरोना काळातील घडलेल्या काही घटनेवर आधारीत भेरा चित्रपटाची कथा आहे.

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा