Disney Hotstar मध्ये या सहा तेलुगू Web Series मराठीत पाहू शकता
डिस्नी हॉटस्टारमध्ये या सहा वेब सिरीज मराठीत पाहू शकता
१) हरिकथा S1 E6
(Harikatha Web Series)
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "हरिकथा" ही मूळ तेलुगू भाषेतील गुन्हेगारी थ्रिलर वेब सिरीज आहे ज्याचे दिग्दर्शन मॅगी यांनी केले आहे आणि याची कथा सुरेश जय यांनी लिहिले आहे.पीपल मीडिया फॅक्टरी निर्मित यात राजेंद्र प्रसाद,श्रीराम,दिवी वड्थ्या, अर्जुन अंबाती आणि सुमन झा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत ,डिस्नी हॉटस्टार मध्ये ही वेब सिरीज मराठीत पाहू शकता याचे एकूण सहा एपिसोड आहेत.
२) "द मिस्ट्री ऑफ मोक्ष आयलंड" S1 E8
(The mystery of moksha island Web Series)
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "द मिस्ट्री ऑफ मोक्ष आयलंड" ही मुळ तेलुगु भाषेतील थ्रिलर वेब सिरीज आहे ज्याचे दिग्दर्शन अनिश कुरुविला आणि संजीव रॉय आणि प्रशांत वर्मा यांनी केले आहे.14 Reels Entertainment निर्मित यात तेजस्वी मदिवाडा,नंदू,पवनी रेड्डी,आशुतोष राणा आणि प्रिया आनंद यांच्या भूमिका आहेत.डिस्नी हॉटस्टारवर ही वेब सिरीज मराठीत पाहू शकता याचे एकूण आठ एपिसोड आहेत.
३) मेंशन २४ (Mansion 24 Web Series) S1 E6
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या "मॅन्शन २४" ही मूळ तेलुगु भाषेतील भयपट थ्रिलर वेब सिरीज आहे,ज्याचे लेखन मयुख आदित्य यांनी केले आहे आणि ओहमकर यांनी दिग्दर्शित केले आहे. ओक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अश्विन बाबू आणि कल्याण चक्रवर्ती निर्मित, यात वरलक्ष्मी सरथकुमार मुख्य भूमिकेत आणि सत्यराज, अविका गोर, बिंदू माधवी इतर कलाकार आहेत. डिस्नी हॉटवर ही वेब सिरीज मराठीत पाहू शकता,याचे एकूण सहा एपिसोड आहेत.
४) "यक्षिणी" S1 E6
(Yakshini Web Series)
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "यक्षिणी" ही तेलुगु भाषेतील रोमँटिक थ्रिलर वेब सिरीज आहे.याचे दिग्दर्शक तेजा मारनी आणि राम वंशी कृष्णा यांनी याची कथा लिहिले आहे. अर्का मीडिया वर्क्सच्या माध्यमातून शोबू यारलागड्डा आणि प्रसाद देविनेनी निर्मित, यात वेदिका, राहुल विजय, लक्ष्मी मंचू आणि अजय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. डिस्नी हॉटवर ही वेब सिरीज मराठीत पाहू शकता,याचे एकूण सहा एपिसोड आहेत.
५) "मिस परफेक्ट" S1 E8
(Miss perfect Web Series)
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "मिस परफेक्ट" ही एक मूळ तेलुगू भाषेतील रोमँटिक कॉमेडी वेब सिरीज आहे.विश्वक खंडेराव दिग्दर्शित आणि फ्रान्सिस थॉमस आणि श्रुती रामचंद्रन यांनी याची कथा लिहिलेली आहे.अन्नपूर्णा स्टुडिओ निर्मित, यात लावण्य त्रिपाठी, अभिजीत दुड्डाला आणि अभिज्ञा वुथालुरू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. डिस्नी हॉटस्टारवर ही वेब सिरीज मराठीत पाहू शकता,याचे एकूण आठ एपिसोड आहेत.
६) "सेव्ह द टायगर्स" S1 E6, S2 E7
(Save the tigers Web Series)
२०२३-२०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या "सेव्ह द टायगर्स" ही मूळ तेलुगु भाषेतील कॉमेडी ड्रामा थ्रिलर वेब सिरीज आहे, जी प्रदीप अद्वैथम आणि माही व्ही राघव यांनी तयार केली आहे आणि तेजा काकुमानु आणि अरुण कोथापल्ली दिग्दर्शित आहे. माही व्ही राघव आणि चिन्ना वासुदेव रेड्डी यांनी थ्री ऑटम लीव्हज अंतर्गत निर्मित यात प्रियदर्शी पुलीकोंडा, अभिनव गोमातम, कृष्णा चैतन्य, देवयानी शर्मा, पवनी गांगिरेड्डी आणि जोरदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डिस्नी हॉटस्टारवर ही वेब सिरीज मराठीत पाहू शकतो,याचे एकूण तेरा एपिसोड आहेत.
(आता हे पाहण्यासाठी Subscription घ्यावा का असा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुम्ही जेव्हा सिम रिचार्ज करता त्यात काही कंपन्या डिस्नी हॉटस्टारची सबस्क्रीपशन फुकट उपलब्ध करून देतात, म्हणजे तुमच्या सिम रिचार्ज सोबत डिस्नी हॉस्टार सुद्धा समाविष्ट असते)
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners
Comments
Post a Comment