हा जगातील तीन श्रेष्ठ चित्रपटांपैकी गौरवलेला देशातील पहिला मराठी चित्रपट होता World's top 3 Great Movies

आज मराठी चित्रपट सृष्टीची अशी परिस्थिती आहे की स्वतःच्याच राज्यात मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीत,अनेक चित्रपट प्रेक्षक नसल्याने चालत नाहीत अशी दयनीय अवस्था असताना भारत देशात पहिला चित्रपट मराठी माणसानेच निर्मिती करून प्रदर्शित केला होता हे मराठी जनता दुर्दैवाने विसरलेले आहेत असे वाटते 

Sant Tukaram film Venice Film Festival

१९३६ साली "संत तुकाराम"(Sant Tukaram Movie 1936) चित्रपटाचे प्रदर्शन मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे करण्यात आले. या चित्रपटात संत तुकाराम यांची भूमिका विष्णूपंत पागनीस यांनी साकारली

(Venice Film Festival)१९३६ व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचा "संत तुकाराम" मराठी चित्रपट, हंगेरीचा "मारिया नोव्हर" (Maria Nover) आणि ऑस्ट्रेलियाचा "फ्लाइंग डॉक्टर" (Flying Doctor)असे एकूण तीन जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड करण्यात आले,"संत तुकाराम" हा एक महान भारतीय चित्रपट म्हणून गणला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेला पहिला भारतीय चित्रपट होता,आणि इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तो प्रदर्शित करण्यात आला होता, संत तुकाराम एका वर्षापेक्षा जास्त काळ एकाच थिएटरमध्ये चालणारा पहिला भारतीय चित्रपट बनून बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. हा प्रभात फिल्म कंपनीचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट होता आणि भक्ती चित्रपटाचा आदर्श बनला होता.
Sant Tukaram film
1936 Sant Tukaram Movie poster by Prabhat film company 


All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा