फसक्लास दाभाडे Movie Review

 मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयावर चित्रपट येत असतात

Fasclass Dabhade Marathi movie Review

असाच नवीन विषय घेऊन हेमंत ढोमे दिग्दर्शित फसक्लास धाबाडे चित्रपटात भाऊ बहीण मधील भांडण वाद मस्करी याची गम्मत पहायला मिळते ,सोबत काही विनोदी दृश्य आहेत जे तुम्हाला खळखळून हसवतात,यातील काही पात्र आपल्यातीलच वाटतील,आणि या सगळ्या सोबत एक महत्वाचा सामाजिक संदेश पण शेवटी यात दिलेला आहे, जसे की आई आपल्या मुलीला वैवाहिक जीवनातील सगळ्या गोष्टी मुलीला समजाऊन सांगते पण मुलाला वडील कधीच वैवाहिक जीवनातील आवश्यक गोष्टी सांगत नाहीत (ते काय मी इथे लिहिणार नाही कारण ते चित्रपट पाहून समजून घ्या कारण इथेच लिहिलं तर त्याची गम्मत चित्रपट पाहताना राहणार नाही) त्याबद्दल चर्चा करत नाहीत त्यामुळे काही मुलांना कसा त्रास सहन करावा लागू शकतो याबाबत उत्तम संदेश यात आहे 

कलाकार :

२४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रमुख भूमीकेत आहेत,अमेय वाघ,सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग ,प्रेमळ आणि नेहमी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आईच्या भूमिकेत निवेदिता सराफ आहेत तर राजसी भावे तर इतकी गोड दिसते अगदी प्रत्येक मुलाच्या स्वप्नातील मॅरेज मटेरियल बायकोची भूमिका साकारली आहे,राजन भिसे वडीलांच्या भूमिकेत आहेत तर उषा नाडकर्णी प्रत्येक घरात कुठे ना कुठे आढळणाऱ्या आत्याच्या भूमिकेत आहेत, दाजीच्या भूमिकेतील हरीश दुधाडे ,मिताली मयेकर आणि इतर कलाकार मंडळींनी सुंदर काम केलेलं आहे


संगीत:

यात अमितराज,आदित्य बेडेकर यांचं उत्तम संगीत आहे ,गाणी क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेत.


निष्कर्ष :

एकुण भावंडांच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या या प्रेमळ कौटुंबीक चित्रपटाला ५ पैकी ⭐⭐⭐✨ (साडे तीन गुण).

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.


Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा