मुक्काम पोस्ट देवाचं घर Movie Review

३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा जिजा या खेड्यातील एक लहान शाळकरी मुलीला "देवाच्या घरी" पत्र पाठवण्याच्या मोहिमेवर आहे,ते का हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल आणि ते एवढ्या सुंदर पद्धतीने दाखवलं आहे की प्रत्येक सीन नंतर पुढे काय होईल याची उत्सुकता वाढत जाते

Mukkam Post Devach ghar movie Review


चित्रपटाचे दिग्दर्शक संकेत माने आहेत ज्यांनी सुमित गिरी यांच्यासोबत पटकथा लेखन एकत्र केलेलं आहे. कोल्हापुरातल्या एका गावात राहणाऱ्या जिजा या लहान शाळकरी मुलीची गोष्ट या चित्रपटात इतका सुंदर दाखवला आहे की तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. एक साधी सरळ गोष्ट त्याला दिग्दर्शकांनी एवढ्या सुंदर रित्या दाखवलं आहे की तुम्हाला ती साधी गोष्ट खूप मोठी आहे याची जाणीव होते,यातील प्रत्येक सीन कथेला अगदी पूरक आहेत,पाहताना कुठेच वाटत नाही की हा सीन उगीच यात घुसवला,यातील विनोद,प्रेमळ नाती,गावातील लोकांची आपुलकी,जिजा या मुलीची निरागसता सगळं अगदी योग्य रीतने मांडलेला आहे,काही दृश्य पाहताना डोळे पाणावतील,आणि तुम्ही या चित्रपटाच्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम कराल हे नक्की.


कलाकार:

या चित्रपटात बाल कलाकार मायरा वैकुळ मुख्य भूमिकेत आहे, आणि स्पृहा परब, मंगेश देसाई, कल्याणी मुळ्ये, उषा नाडकर्णी, सविता मालपेकर आणि प्रथमेश परब , माधवी जुवेकर या इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.सर्वांचा अभिनय खूप नैसर्गिक वाटतो. आणि पाहुणे कलाकार म्हणून अभिनेत्री पूजा सावंत आणि कमलेश सावंत सुद्धा यात विशेष भूमिकेत आहेत


संगीत:

चिनार महेश यांचं संगीत आहे तर पार्श्व संगीत आदित्य बेडेकर यांनी दिला आहे जो कथेला आणि चित्रपटाला अगदी शोभणारी गाण्या सोबत करमणूक करते


वेळ : 

चित्रपटाची लांबी केवळ २ तास आहे त्यामुळे कंटाळा येत नाही सगळ्या गोष्टी अगदी योग्य वेळी योग्य ठिकाणी दाखवलेली आहेत

निष्कर्ष :

मायरा वैकुळने या संपूर्ण चित्रपटाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे,यातील गाणी योग्य आहेत,सुंदर संवाद ,अप्रतिम दिग्दर्शन,सर्वांचा सुंदर अभिनय जो गावातील सुंदर वातावरणाचा अनुभव प्रेक्षकांना देतो,यात कुठेच कंटाळवाणा सीन नाही , एका साध्या कथेला सुद्धा एवढ्या सुंदर प्रेमळ पद्धतीने दाखवल्या बद्दल या चित्रपटाला ५ पैकी ⭐⭐⭐⭐ गुण

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा