द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स मराठी Web Series Review
"The Secret of the Shiledars" ही बहुचर्चित वेब सिरीज ३१ जानेवारी २०२५ रोजी डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. जे तुम्ही फुकट(free) पाहू शकता.
डॉ.प्रकाश कोयडे" यांच्या "प्रतिपश्चंद्र" या कादंबरी पुस्तकावर ही वेबसीरिज आधारीत आहे. मराठा साम्राज्यातील लपवलेल्या रहस्यमयी खजिन्याचा शोध घेणारी ही अद्भुत कथा आहेक्लासमेट,माऊली,झोंबीवली,मुंज्या फेम चित्रपटाचे दिग्दर्शक "आदित्य सरपोतदर" यांनी ही सिरीज दिग्दर्शित केलेली आहे
या वेब सिरीजची कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांनी आणि त्या शिलेदारांच्या वंशजांनी जपून ठेवलेल्या रहस्याची आहे,यात तुम्हाला मराठा साम्राज्य आणि विजय नगर साम्राज्य यांच्यातील संबंध कसे होते याबद्दल खूप सुंदर इतिहास पाहायला मिळेल,जे पाहताना शिवप्रेमी ,ईतिहास प्रेमींना खूप हृदयस्पर्शी आणि अभिमानास्पद वाटणार यात शंका नाही. यात एकूण सहा एपिसोड आहेत (S1 Episode 6) .
भाषा:
"सीक्रेट ऑफ शिलेदार्स" "मराठी",हिंदी,बंगाली, मल्याळम,तमिळ,तेलुगू,कन्नड अशा एकूण सात भाषेत ही वेब सिरीज उपलब्ध आहे, मराठीत खुप उत्तम डब केलेला आहे, मराठा इतिहासाची खरी गम्मत मराठीत पाहताना येते
पार्श्व संगीत:
यात संगीत "ट्रॉय-आरिफ" यांनी दिला आहे जे अप्रतिम आणि प्रत्येक रहस्यमयी सिनमध्ये उत्सुकता निर्माण करते
कलाकार :
मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर,राजीव खंडेलवाल ,सई ताम्हणकर,आशिष विद्यार्थी,गौरव अमलानी,चिन्मय उदगीरकर इतर सर्वांनी उत्तम अभिनय केलेला आहे,खासकरून सई ताम्हणकरने केलेले ॲक्शन सीन अप्रतिम आहेत जे तुम्हाला खूप आवडणार
निष्कर्ष :
मराठा साम्राज्यातील लपवलेल्या रहस्यमयी खजिन्याचा शोध घेणारी ही अद्भुत कथा आहे त्यामूळे पाहताना मराठी लोकांनां नक्कीच अभिमान वाटतो, पण यात राहून राहून वाटतं की राजीव खडेलवाल यांची भूमिका जर एखाद्या मराठी अभिनेत्याने केली असती तर पाहताना छान मराठमोळा अनुभव मिळाला असता , आणि ही वेब सिरीज पाहताना कुठे तरी जाणवते की अजुन जास्त रहस्यमयी गोष्टी दाखवता आल्या असत्या तर अजून पुढे काय होईल याची उत्सुकता अजून जास्त वाढली असती,बाकी उत्तम आहे. हि वेब सिरीज खासकरून लहान मुलांना जास्त आवडणार,एकूण या वेब सीरिजला ५ पैकी ⭐⭐⭐✨ (साडे तीन गुण )
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.
People also search for :
The secret of the shiledars episodes
The Secret of shiledar release date
The secret of the shiledars ott
The secret of the shiledars total episode
The Secret of the shiledars trailer
The secret of the shiledars how many episodes
Comments
Post a Comment