छावा पुन्हा मराठी भाषेत प्रदर्शित करणार आणि लवकरच रितेश देशमुख,रिषभ शेट्टी हे दोघे छ.शिवरायांच्या भूमिकेत पहायला मिळणार

छावा पुन्हा मराठी भाषेत प्रदर्शित करणार आणि लवकरच रितेश देशमुख,रिषभ शेट्टी हे दोघे छ.शिवरायांच्या भूमिकेत पहायला मिळणार




मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी छावा चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित करणार अशी माहिती त्यांच्या X सोशल मीडिया खात्यावरून हल्लीच दिली होती,त्यामुळेच लवकरच छावा चित्रपट आपल्या मराठी भाषेत पाहायला मिळणार आहे,कारण अनेक मराठी भाषा प्रेमींनी छावा मराठीत प्रदर्शित करा अशी मागणी केली होती 


त्यानंतर मराठीत "रितेश देशमुख" दिग्दर्शित "राजा शिवाजी" चित्रपट येणार आहे,वेड या त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट खूप यशस्वी झाला होता, त्यानंतर राजा शिवाजी हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट ठरणार आहे ज्यात शिवरायांची भूमिका स्वतः साकारणार आहेत प्रेक्षकांना याची खूप आतुरता आहे.

"द प्राइड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज" चित्रपट कन्नड अभिनेता रिषभ शेट्टी यात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे जे २०२७ मध्ये मराठी भाषेत प्रदर्शित होईल अशी माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हल्लीच दिली होती

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा