मराठी प्रेक्षक सोशल मीडियावर काही मराठी अभिनेत्यांना सतत ट्रोल का करतात
सोशल मीडियावर नेहमी सचिन पिळगावकर किंवा स्वप्नील जोशी आणि अशा अनेक मराठी अभिनेत्यांना लोक ट्रोल करताना आपण पाहत असतो,आणि हल्लीच संतोष जुवेकर यांना लोकांनी इतकं ट्रोल केलं की सोशल मीडियाच्या इतिहासात कधीच असे घडले नसेल
नेहमी हे पहायला मिळते की जे कलाकार हिंदीत काम केल्यावर त्यावर जे वक्तव्य करतात त्यावरून ट्रोल होतात,
मुळात आपण हे समजून घेतले पाहिजे की मरठी प्रेक्षक आपल्याच मराठी अभिनेत्यांना ट्रोल का करतात?
मराठी प्रेक्षकांना हिंदीत काम केलेलं आवडत नाही का? असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो
किंवा हे अभिनेते मराठीत मुख्य भूमिका आणि हिंदीत दुय्यम भूमिका करतात याचा मराठी प्रेक्षकांना राग येतो का?
जे मराठी प्रेक्षक यांना ट्रोल करतात ते मराठी चित्रपट प्रेमी असतात का हे पण पाहण्याची गरज आहे, जर मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट आवर्जून पाहिले तर यांना हिंदीत काम करण्याची गरजच उरत नाही
ज्या प्रमाणे साऊथमधील चित्रपट त्यांचे लोक आवडीने पाहतात यामुळेच ते मोठे सुपरस्टार होऊ शकले, पण मराठीत सुपरस्टार ही संकल्पनाच नाहीये आणि त्यामुळे मराठी अभिनेते हे केवळ नट असल्याने हिंदीत पण काम करतात जर ते मराठीत सुपरस्टार असते तर त्यांना हिंदीत दुय्यम काम करण्याची गरजच पडली नसती हे खरे तर मराठी प्रेक्षकांनी खासकरून बॉलीवूड हिंदी प्रेमी मराठी प्रेक्षकांनी लक्षात ठेवले पाहिजे.
यात काही मराठी कलाकार पण कारणीभूत आहेत,अनेक मराठी कलाकार बॉलिवूडला खूप महत्व देतात,हिंदीत काम करणे म्हणजे दर्जा मराठीत काम करणे म्हणजे डाऊन मार्केट ही समज आहे अनेकांना, काही जण तर सुरुवातीलला मराठीत यासाठी काम करतात कारण त्यांना वाटते मराठीत काम केल्यावर बॉलिवूडमध्ये संधी मिळते, अशा भ्रमात असलेल्या लोकांनी भारतीय पहिल्या मराठी चित्रपट सृष्टीचा अभिमान बाळगुन मराठीत काम करणे म्हणजे दर्जा प्रतिष्ठा आहे हिंदीत नाही हे जगाला ठामपणे सांगतील तेव्हाच लोक ट्रोल करणे बंद करतील
All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners
Comments
Post a Comment