तमिळमध्ये मराठी माणूस सुपरस्टार आहे पण मराठीत असा एकही सुपरस्टार का नाही

जेव्हा "सैराट" आला आणि मराठीत सर्वात जास्त ११० कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला तेव्हा वाटलेलं की "आकाश ठोसर" हा पुढे सुपरस्टार म्हणून ओळखला जाईल,पण आज तो कुठे गेला कोणाला पत्ताच नाही मराठीत एक काळ असा होता जेव्हा "दादा कोंडके' यांचे चित्रपट प्रदर्शित झाले की राज कपूर सारखे निर्माते पण घाबरत होते की हिंदी चित्रपट आता दादांच्या चित्रपटासोबत प्रदर्शित केले तर लोक पाहणार नाहीत,दादा कोंडके हे एकमेव असे मराठी "सुपरस्टार" होऊन गेलेत ज्यांच्यावर सतत नऊ चित्रपट सुपरहिट झाल्याने "गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड" आहे,पण त्यानंतर असा एकही मराठी सुपरस्टार नाही झाला. तमिळ सुपरस्टार "रजनीकांत" यांचे खरे नाव आहे "शिवाजीराव गायकवाड",अनेक लोकांना हे अजून माहीत नसेल,पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक मराठी माणूस तमिळनाडूत जातो आणि तिथला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून उदयास येतो,या देशात चित्रपट मराठी माणसाने सुरू करून सुद्धा स्वतःच्या राज्यात मराठी चित्रपट चालेनात,मराठी निर्माते कोणाच्या भरवश्यावर चित्रपट निर्मिती करतील हा मोठा प्रश्न आहे ? ...