Posts

Showing posts from January, 2025

Chaava ट्रेलर पाहून नितीश भारद्वाज यांनी सुध्दा चित्रपट करण्याची घोषणा केली

Image
आता पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांवर सहा चित्रपट आणि एक मालिका प्रदर्शित झाली आहे,कोणी कोणी भूमिका साकारली जाणून घ्या. १) "छत्रपती संभाजी" हा एन.डी सरपोतदार यानी १९२५ मध्ये दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक मूकपट आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९२५ रोजी मॅजेस्टिक सिनेमा, गिरगाव, मुंबई येथे प्रदर्शित झाला.यात पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली . २) "छत्रपती संभाजी" हा पार्श्वनाथ आळतेकर यानी १९३४ मध्ये दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे. यात मास्टर विठ्ठल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली . ३) "स्वराज्यरक्षक संभाजी" ही मालिका २४ सप्टेंबर २०१७ ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत झी मराठीवर प्रसारित झाली होती,कार्तिक केंढे आणि विवेक देशापांडे दिग्दर्शित या ऐतिहासीक मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका डॉ अमोल कोल्हे यांनी साकारली . ४) "छत्रपती संभाजी" चित्रपटाचे मूळ शीर्षक "संभाजी १६८९" असे होते आणि त्याची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती. चित्रपट बनवण्यासाठी नऊ वर्षांचा कालावधी लागला आणि चित्रपटगृहात प...

Jio Cinema वर या चार Web Series मराठीत फुकट (Free) पाहू शकता

Image
सध्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर बहुभाषिक वेब सिरीज बनविल्या जातात.जिओ सिनेमावर सुद्धा भरपुर बहुभाषिक चित्रपट,वेब सिरीज मराठी भाषेत उपलब्ध आहेत एका काळेचे मणी Eka Kaleche Mani S1 Episode 6 ही वेब सिरीज जियो सिनेमावरील २०२३ ची त्यांची पहिलीच मराठी वेब सिरीज आहे,मराठी कुटुंबातील हलकीफुलकी विनोदी कथा यात पाहायला मिळेल, प्रशांत दामले, समीर चौघुले, हृता दुर्गुले, विशाखा सुभेदार, पोर्णिमा मनोहर, वंदना गुप्ते, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर सारखे कलाकार मंडळी यात आहेत,निर्माता महेश मांजरेकर,ज्योती देशपांडे,ऋतुराज शिंदे,ऋषी मनोहर आहेत तर दिगदर्शक अतुल केतकर आहेत.याचे लेखक ओम भुतकर, सिद्धार्थ महाशब्दे आहेत, यात एकूण सहा मालिका आहेत.  दो गुब्बारे Do Gubbare S1 Episode 6 जियो सिनेमावरील २०२३ ची ही वेब सिरीज एक तरुण आणि म्हाताऱ्या माणसाच्या अनपेक्षित मैत्रीवर आधारित आहे.जे तुम्ही मराठी भाषेत पाहू शकता,वरूण नार्वेकर दिग्दर्शीत या मालिकेत मोहन आगाशे, सिद्धार्थ शॉ, मल्हार राठोड, मानसी पारेख आणि हेमांगी कवी. वरुण नार्वेकर आणि कल्याणी पंडित यांनी ही मालिका लिहिली आहे, ज्योती देशपांडे यांनी मालिकेची निर...

पण जिलबी तर गोड असते ना? Jilabi Movie Review

Image
 १७ जानेवारी २०२५ ला जिलबी चित्रपट प्रदर्शित झाला. नितीन कांबळे दिग्दर्शित जिलबी चित्रपट एका हत्येवरून शोध त्यावरून संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या पार्श्भूमीवर याची कथा आहे,यात खटकणारी गोष्ट म्हणजे जिलबी चित्रपटाची सुरुवातच हिंदी संवादाने होते तेव्हा प्रश्न पडतो याला मराठी चित्रपट म्हणायचं का ? की मराठी/हिंदी चित्रपट म्हणायचं ?    ५०% हिंदी मिश्रित संवाद असलेल्या जिलबी चित्रपटाचा एकही संवाद(Dilogue) लक्षात राहत नाही, उदाहरणार्थ मुळशी पॅटर्न मधील संवाद इतके प्रसिद्ध झाले की त्यावर आजही Meme करतात लोक.नेहमी चॉकलेट बॉयची भूमिका करणाऱ्या स्वप्नील जोशी यांनी यात पहिल्यांदा एका पोलिस अधिकारीची भूमिका साकारली आहे ते तुम्हाला यात विशेष वाटेल.प्रसाद ओक यांनी साकारलेली भूमिका सौरव सुभेदार हजारो कोटींचा मालक असतो पण चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही की सुभेदार कुटुंबाची हजारो कोटींची संपत्ती आणि व्यवसाय आहे. संगीत :  जिलबी चित्रपटात अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत(Background Music) आहे,या चित्रपटात एकही गाणं नाही आणि यातील पार्श्वसंगीत तुम्हाला जरा विचित्र वाटू शकतो....

OTT वाल्यांनी नाकारल्याने "अमलताश" मराठी चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करावा लागला

Image
 "अमलताश" मराठी चित्रपट ०८ मार्च २०२४ ला महाराष्ट्रसह जगभरात प्रदर्शित झाला होता,तेव्हा त्याची खूप चर्चा आणि कौतुक पण केले सर्वांनी पण नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायची वेळ आली तेव्हा नेटफ्लिक्स(Netflix),सोनी लिव्ह(Sony Liv) इतर सर्वांनी आम्हाला मराठीमध्ये इंटरेस्ट नसल्याने नको म्हणून सांगितल्याने मग शेवटी"अमलताश" चित्रपट १४ डिसेंबर २०२४ ला यूट्यूबवर प्रदर्शित करावा लागला काल प्रसिद्ध गायक अभिनेता राहुल देशपांडे यांच्या यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट पाहिला,तुम्हाला जर शांत प्रेमळ सांगीतिक अनुभव घ्यायचा असेल तर "अमलताश" चित्रपट नक्की बघा ,खूप सुंदर कथा आणि अगदी सहज नैसर्गिक अभिनय पाहायला मिळेल.  संगीत :  संगीतकार भूषण मराठे यांचा सुमधुर भावनिक संगीत आणि पार्श्वसंगीत आहे ,तुम्ही जर संगीतप्रेमी असाल तर चित्रपटातील संगीतमय वातावरण तुमच्या अगदी जवळचा वाटेल. कलाकार : राहुल देशपांडे सोडले तर या चित्रपटातील बहुतेक कलाकार अनोळखी नवीन आहेत,पण या सर्वांचा अभिनय देखील प्रभावी आहे. सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे सहज साकारल्या आहेत. विशे...

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

Image
"संगीत मानापमान" हा चित्रपट १९११ सालच्या मराठीतील संगीत मानापमान नाटकवर आधारित आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या संगीतनाटकात बालगंधर्वांनी काम केले होते. या अशा अजरामर संगीतनाटकावर चित्रपट करणे म्हणजेच एक खूप मोठा धाडसच आहे जेव्हा अभिनेता सुबोध भावे संगीत मानापमान चित्रपट दिग्दर्शन करणार अशी बातमी येत होती तेव्हा सुबोध भावे यांचा संगीत नाटकावर "कट्यार काळजात घुसली" यशस्वी चित्रपट आधीच एक आहेच आणि आता अशाच संगीतनाटकावर अजून एक प्रयोग हे करू पाहत आहेत हे ऐकून जरा भीतीच वाटत होती की लोकांना परत तसाच चित्रपट आवडेल का ? पण रविवारी हा चित्रपट प्रत्यक्षात पाहिला तेव्हा लक्षात आले की "संगीत मानापमान" हा चित्रपट नाहीच... तर एक सुंदर प्रेम कथेवर आधारित सुंदर कलाकृती आहे",आणि कलाकृती हे त्यांनाच आवडते ज्यांना कलेची किंमत माहित असते ज्या लोकांना खासकरून तरुण पिढीला हा चित्रपट नक्की कशावर आधारीत आहे हे माहीत नसेल आणि मराठीत सतत येत असलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या गर्दीत संगीत मानापमान पण एक ऐतिहासिक चित्रपट आहे असा गैरसमज अजिबात करून घेऊ नये कारण रविवार अ...

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

Image
पुष्पाच्या आधी अल्लू अर्जुनचा एकही चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाले नाही कारण बाहुबलीच्या नंतर ही ट्रेंड देशात मोठ्या प्रमाणात तयार झाली,या आधी रजनीकांत,कमल हसन यांचे चित्रपट केवळ हिंदीत प्रदर्शीत होत असत,पण हिंदी डब पात्र इतर भाषेतील लोकांना जवळचे वाटत नव्हते, त्यामुळे पाच ते अनेक भाषेत प्रदर्शित केल्या नंतर चित्रपट निर्मात्यांना आणि अभिनेत्यांना स्वतःसाठी एक मोठा आधार तयार झाला. २०२१ मधील पुष्पाच्या यशाने अल्लू अर्जुनचा पॅन-इंडियन स्टार म्हणून दर्जा मजबूत करण्यात मदत केली . पॅन  इंडीयन चित्रपटांची निर्मिती संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून केली जाते, अनेक भाषांमध्ये डब केले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केले जाते. या दृष्टिकोनामुळे त्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेरही कामगिरी करण्यास मदत होते (प्रभासचा देखील बाहुबलीच्या आधी एकही चित्रपट संपूर्ण देशात पॅन इंडीयन प्रदर्शित झाला नाही)   <script type="text/javascript"> atOptions = { 'key' : '1b7647ada89967961c729290a5b672eb', 'format' : 'iframe', 'height' ...